Timepassktta हा blog खास तुमच्या साठी बनवला गेलाय! यावर आम्ही शक्य तितक्या कामाच्या hacking ,tricks,security information व तितक्याच timepass मधून देखील time waste ऐवजी invest केल्याचा आनंद देणाऱ्या posts टाकत जावू ! बाकी पुस्तकाच्या cover वरुन आत काय ते सगळ कधीच समजत नाही ..... so, या प्रवास करा स्वतः आनंदी व्हा आणि इतरांना ही आंनदी करा _/\_

2016/12/13

नवे नवे विचार..... (new thoughts)



स्वप्न
"आयुष्यात लहानपणी तुझ स्वप्न काय होत?" सहज एका उदास तोंड घेऊन बसलेल्या मित्राला मी विचारल .... त्याने "doctor!" अस typical तेच उत्तर दिल .... !

भर जवानीत काय होत?? "अरे आता का पिकून गळायला आलोय का?" जरास थोबाड वाकड करत त्याने विचारल.
मी हसत म्हणालो, " ए भावा तु zipri च्या मागे लागला होता ना तेव्हा काय स्वप्न होत?? आपण 10 वीत असताना!"
कोरडया दगडावर पाण्याचा थेम्ब चमकावा तसा लगेच त्याचा चेहरा चमकला. दात काढत अन गालातल्या गालात बेणं पिरमळ वाणीत सांगाया लागला ...


"काय सांगू भावा, ती स्वतः एका स्वप्ना सारखी होती, माझ स्वप्न फक्त ते स्वप्न जगन्याच होत, इतर शहरी पोरां-पोरीसारख गाडीवर फिरवन , तोंडात तोंड घालून बसण अस्ल काहि मनात न्हवत ... मोठा होऊन तिच्या बरा लग्न करायच, आयुष्य सगळ तिच्या बरा जगायच , आई वडिलांना सांभाळनारी तिच्या सारखी दूसरी पोरगी कुठ भेटल?" कळत न कळत डोळ्यात पाणी आणत तो एका वेगळ्याच विश्वातून बाहेर आला होता .

"ठिक आहे, झालास तू मामा आता ते सोड , पुढे 12 वी ला असताना काय स्वप्न होत मग?" मी परत मूळ मुद्याकडे घेऊन आलो.

" 12 वीला Enggineer व्हायच स्वप्न पाहिल होत थाटामाटात उगीच admission घेतलो होतो science ला fail झालो की परत सगळी स्वप्न धुळीत मिळाली राव."
परत चेहरा पाडत बोलला तो!

"बघ ना, लहानपणी आपल्याला खेळणी मिळवन , नंतर थोड़ मोठे झालो की scholor नस्ताना scholaorship मिळवन, थोड़े मोठे झालो की 10वी काहिही करुन सुरुवातीला पहिला येण नंतर परिक्षे पुढे निदान पास तरी होण, शेवटी कसेबसे सुटलो की प्रेमात पडण .... मग आपल्या ती च स्वप्न बघण , ती गेली की परत 12 वी मग विंजीनीअर डॉक्टर मग असच कुणीतरी बनण त्यात त्यात पास होऊन पण जॉब न भेटण , भेटला तरी यार परत नवीन काहि स्वप्न..."

"काय बोलतोस राव तु! शप्पथ, आपण काय जगलोय त्यातून आपून खरच काही शिकत नाही राव....तुला काय सांगायच ते कळलं मला !"


"बस्स अजून काय कदाचित यालाच आयुष्य म्हणतात वाटत, एक स्वप्न खोट ठरल तरी दुसर बघायच .....त्याच्यावर जीव लावायच...त्याच्या साठी जीव तोडून मेहनत करायची .....अन तरी परत ते ही खोट ठरलच तर 1 नव स्वप्न बघायच!"

त्याच्या चहा सोबत आमचा विषय पण संपला होता, निरोप घेताना इतकच बोलला .... "आज 1 नवं स्वप्न बघनार , अन बघच भावा तू ते मी नाही हरवू देणार!"
~S.J.
13/12/2016.
@03:51am - 04:31am

______________________________________________
 .  . 

 .  .  .  .  .  .  .   **ℓιfє**                      



"life ना यार फार बोर झाली होती मध्ये मध्ये .... अस वाटायच की यार उगी श्वास चालू आहेत पण हृदयात काहीच नाहि ....
कधी एकदा संपतय आयुष्य अस वाटत होत .... पण गेल्या काही दिवसात खुप बदललय सगळच .... श्वास हृदयात गीत गात असतात अन आयुष्य जगतोय भरभरुन अस वाटतंय .... वेळ कमी पडतोय! होय नक्कीच धावत्या जगात आलोय.. परत न थांबण्यासाठी !"
#Unstoppable
~S.J.
______________________________________________
 . 

 .  .  .  .  .  .  .  ** शब्द**                  


"आजकाल कळायला लागलय शब्दांना पण किंमत आहे माझ्या .... म्हणून यापुढे उगीच त्याची किंमत न समजनार्या व्यक्तिवर मी ते उधळणार नाही आता #कधीच!"
#being_practical
~S.J.

2 comments:

  1. Mast ahe blog..👍 Ani ho pahilych praytnat ekdam bhari banvala ahe .. best of luck to both of you ...👍👍👍

    ReplyDelete
    Replies
    1. Thanks sir.😃 we will try to give our best. keep visit our blog.

      Delete

Popular

Recent

analyticstracking.php

Comments